Visit our parent website: www.redevelopmentofhousingsocieties.com



Follow me on

        

        




DISTRICT CONSUMER FORUM ON HOUSING SOCIETY CAN ALLOT ONLY ONE CAR PARKING SPACE TO EACH MEMBER

The Suburban District Consumer Forum while dismissing complaint of one of the members residing at Dheeraj Enclave Tower at Borivli (East) has recently ruled that a Co-operative Housing Society is not bound to provide more than one parking space to a member. The member had chal¬lenged a penalty which was levied on him by the Society for park¬ing his two more cars in addition to the one for which parking space had been provided.

The said member was allotted only one car parking space in the Society’s premises. It is reported that he purchased a second car in the year 2011 and a third car, a year later. For parking of both these additional cars, the Society charged the said member Rs.500/- as penalty since no approval was accorded by the Society to park his additional cars.

The Dheeraj Enclave Tower Society, on August 2nd 2014, passed a resolu¬tion and enhanced the penalty from Rs.500/- to Rs.2,000/- and also asked all its members who owned more than one car, to park the additional cars out¬side the Society premises from August 31st 2014.

While disobeying the directives of the Society, the delinquent member did not move his two additional cars outside the Society. Hence, the Society levied penalty at the rate of Rs.500/- per car per day.

The member then approached the Suburban District Consumer Forum, seeking the cancella¬tion of extra parking charges and penalty. The Forum rejected the complaint noting that in compliance of rules the Co-operative Housing Society has provided parking space for one car of the complain¬ant and it is not bound to pro¬vide parking spaces for more than one vehicle for its mem¬bers.

The Forum said that the complainant was using the premises of the Society for parking his additional vehi¬cles without the permission of the Society and therefore, the penalty was levied.

While dismissing the complaint, the Forum observed that the dispute appears to be about the penalty imposed by the Housing Soci¬ety on the complain¬ant and not about providing any service by the Society and therefore, the dis¬pute does not fall within the purview of the Consumer Protection Act. The ruling of the Forum is given hereunder:

CONSUMER DISPUTES REDRESSAL FORUM,
MUMBAI SUBURBAN DISTRICT
ADMINISTRATIVE BLDG,
NEAR DR.BABASAHEB AMBEDKAR GARDEN,
BANDRA (E), MUMBAI-400051
Complaint Case No. CC/278/2015

MR. VIJAY PANDIT
Flat no. 302, tower 1a, Dheeraj
Enclave, opp. Bhor Industries, Off
Western Express Highway, Borivali
East, Mumbai - 400 066 ...........Complainant (s)

Versus

DHEERAJ ENCLAVE TOWER CO-OP. HOUSING SOCIETY

Through its Hon’ble Chairman
Secretary, Regd. No. MUM/WR/HSG/
TC/11715/2002/2003/2002 Opp.
Bhor Industries, Off Western Express
Highway Borivali East, Mumbai - 400066
............Opp. Party

BEFORE:

HON'BLE MR. A.Z.TELGOTE PRESIDENT
HON'BLE MRS. KIRTI KULKARNI MEMBER
HON'ABLE MR. S.R.SANAP MEMBER

For the Complainant:
For the Opp. Party:

ORDER dated 16/09/2015
आदेश - मा. श्रीमती. किर्ती कुलकर्णी, सदस्या.- ठिकाणः बांद्रा (पूर्व), मुंबई
निशाणी 1 वर आदेश

1. मंचाकडून तक्रारीचे व सोबत दाखल केलेल्या कागदपत्रांचे वाचन करण्यात आले.

2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार हे सामनेवाले गृहनिर्माण सोसायटीचे सभासद आहेत. तक्रारदाराकडे पूर्वी 2005 मध्ये एक कार होती व नंतर त्यांनी सन 2011 मध्ये दुसरी कार खरेदी केली. सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्यांच्या कारसाठी पार्कींगची जागा उपलब्ध करून दिली होती व दुस- या कारसाठी रू.500/-,चॉर्ज केले होते. तक्रारदाराने नंतर सन 2012 साली तिसरी कार खरेदी केली. सामनेवाले सोसायटीने सभासदांच्या दुस-या कारसाठी चॉर्ज केलेल्या रू. 500/-,मध्ये वाढ करून त्याऐवजी रू.2,000/-,चॉर्ज करण्याचे ठरविले व तसा ठराव दि. 02/08/2014 रोजी मंजूर केला. सामनेवाले यांनी तक्रारदाराला व दोन वाहनाचे मालक असलेल्या इतर सभासदाला त्यांचे दुसरे वाहन इतरत्र पार्क करण्यास सांगून दि.31/08/2014 पूर्वी तिथून हलविण्यास सांगीतले मात्र तक्रारदारानी त्यांचे दुसरे व तिसरे वाहन पार्कीगच्या जागेमधून हटविले नाही व त्यामुळे सामनेवाले यांनी दि. 01/09/2014 बिलात दुस-या व तिस-या कारच्या पार्कींगपोटी प्रत्येकी प्रतिदिन रू.1,000/-,या दराने दंड आकारला व तक्रारदाराला त्यानूसार पुढील बिल देण्यात आले व त्यावर नाराज होऊन तक्रारदाराने प्रस्तुतची तक्रार दाखल केली. सामनेवाले यांनी बसविलेले पार्कींग चॉर्जेस व पार्कीग पेनॉलटी नियमीत करण्यात यावी अशी विनंती तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारीत केली.

3. तक्रारदाराचा दाखलपूर्व युक्तीवाद ऐकण्यात आला व अभिलेखावर उपलब्ध असलेल्या कागदपत्राचे वाचन करण्यात आले. तक्रारदार हे सामनेवाले गृहनिर्माण संस्थेचे सभासद आहेत हे त्यांनी दाखल केलेल्या शेअर सर्टिफिेकेटवरून दिसून येते. तक्रारदाराकडे आजमितीस एकुण 3 कार आहेत. सामनेवाले यांनी तक्रारदाराच्या एका कारसाठी पार्कींगची जागा अधिकृतपणे उपलब्ध करून दिली व त्यासाठी दरमहा केवळ रू.150/-,आकारले. हे तक्रारदाराच्याच कथनावरून निदर्शनास येते. मात्र, तक्रारदाराने आपले दुसरे व तिसरे वाहन देखील सोसायटीच्या कम्पांऊमध्ये पार्क केले. सोसायटीने सदर वाहनासाठी प्रत्येकी रू. 2,000/-,चॉर्ज केले व तक्रारदाराला त्यांचे दुसरे व तिसरे वाहन सदर जागेतुन हटविण्यास सांगीतले परंतू तक्रारदाराने त्यास प्रतिसाद न दिल्यामुळे सामनेवाले यांनी त्यांच्या वर दंड आकारला हे उपलब्ध कागदपत्रांवरून दिसून येते. वरील बाबी लक्षात घेता हे स्पष्ट होते की, तक्रारदार व सामनेवाले यांच्यामध्ये पार्कींगच्या जागे संदर्भात व तिचा वापर केल्याबद्दल आकारलेल्या दंडाच्या संदर्भात वाद आहे. सामनेवाले यांनी तक्रारदाराला त्यांच्या एका वाहनासाठी नियमानूसार पार्कींगची जागा उपलब्ध करूनदिली आहे व त्याबाबत उभयतामध्ये कुठलाही वाद नाही. असे असतांना तक्रारदार हे त्याच्या इतर दोन कारसाठी देखील सोसायटीची जागा सोसायटीच्या परवानगीशिवाय वापरत आहेत. उभयतामधील वाद हा सेवा पुरविण्याच्या संदर्भात असल्याचे दिसत नाही. सदरचा, वाद हा ग्रा.सं.कायदयाच्या कक्षेत येणारा नाही. कारण, सामनेवाले यांनी तक्रारदाराला नियमानूसार एका वाहनासाठी पार्कींगची जागा उपलब्ध करून देऊन योग्यप्रकारे सेवा दिली आहे. सभासदांच्या एकापेक्षा जास्त वाहनासाठी पार्कींगची जागा उपलब्ध करून देणे सोसायटीवर बंधनकारक नाही. सभासदाकडे अतिरीक्त वाहने असल्यास त्यांच्या पार्कींगच्या जागे संदर्भात शुल्क वसुल करणे ही बाब सोसायटीच्या कामकाजाशी निगडीत आहे व अशाप्रकारचा वाद ग्रा.सं.कायदयाच्या कक्षेत येत नाही. सबब, प्रस्तुतची तक्रार दाखल करून घेता येणे शक्य नाही. म्हणून मंच पुढीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे.

आदेश

1 ग्राहक क्रमांक 278/2015 फेटाळण्यात येते.

2. आदेशाची प्रत तक्रारदारांना विनामुल्य पाठविण्यात यावी.

[HON'BLE MR. A.Z.TELGOTE]
PRESIDENT

[HON'BLE MRS. KIRTI KULKARNI]
MEMBER

[HON'ABLE MR. S.R.SANAP]
MEMBER

 

**********